नव्या भारताच्या उभारणीवर 24 रोजी भाजपतर्फे चर्चासत्र

0
958
गोवा खबर:गोवा प्रदेश भाजप तर्फे सोमवारी 24 फेब्रूवारी रोजी नव्या भारताच्या पायाभरणीसाठी या विषयावर केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 च्या अनुषंगाने एका विशेष संवादात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यावेळी उपस्थितांशी संवाद साधणार आहेत.
सोमवारी 24 फेब्रूवारी रोजी सायंकाळी 6 वाजता पणजी येथील हॉटेल फिदाल्गो मध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत,केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे उपस्थित राहणार आहेत.