नव्या ब्रँड मोहिमेने पार्ले ने आणला आणखीनच गोडवा

0
1018

 

पार्ले तर्फे एकात्मिक ब्रँड मोहिमेची सुरुवात करण्यात आली असून या मार्फत पार्लेच्या विविध
कन्फेक्शनरी उत्पादनांवर या अंतर्गत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. बिस्कीट आणि कन्फेक्शनरी उत्पादक कंपनी
म्हणून ज्या प्रमुख आव्हानांना तोंड द्यावे लागते तेच हाताळण्यासाठी या मोहिमेतुन अभिनव आणि विनोदी पद्धत
अवलंबण्यात आली आहे. कन्फेक्शनरी उत्पादनांमध्ये ब्रँडच्या काही मर्यादांना योग्य रितीने लढा देण्यासाठी तसेच
ग्राहकांना रि-ब्रॅण्डिंग उपक्रमांबाबत माहिती करून देण्यासाठी या मोहिमेत तरतूद करण्यात अली असून त्या योगे पार्ले
च्या प्रत्येक वेगळ्या ब्रँड साठी इक्विटी निर्माण करण्यासोबत, कॉर्पोरेट ब्रँड म्हणून बळकटी देण्याचा या मोहिमेचा
उद्देश आहे.
या मोहिमे बद्दल बोलताना, कृष्णा राव, कॅटेगिरी हेड, पार्ले प्रॉडक्ट्स यांनी सांगितले की, पार्ले ने प्रथम एक कन्फेक्शनरी
म्हणून जरी सुरुवात केली असली तरी देखील आज आम्ही भारतातील आवडत्या कंपन्यांपैकी एक आहोत ज्यांच्या
पोर्टफोलिओ मध्ये ५० ब्रॅण्ड्स आहेत. नवीन मोहीम विनोदी आहे आणि ती आपण अनुभवासोबत जोडू शकतो त्यामुळे
आमचा उद्देश त्यातून साधला जात आहे. ही मोहीम 'नाम तो सुना ही होगा' या वर्षाच्या सुरुवातीच्या मोहिमेची पुढची
पायरी आहे.
टॅपरूट देंस्तू तर्फे संकल्पित ३-भाग -टीवीसी क्लस्टर प्रमाणे सामोरे जावे लागणारी सामान्य आव्हाने हाताळणार आहे.
माझेलो , लंडनडेरी, कॅफेचीनो यांचा प्रतिसाद चांगला असला तरी या उत्पादनांबद्दल लोकांना माहितीचा अभाव आहे.
दरम्यान मँगो बाईट, कच्चा मँगो बाईट आणि मेलोडी या उत्पादनांना इमिटेशन कॅण्डीज चे आव्हान आहे. बिस्किटांमध्ये
बर्बन, जॅम-इन आणि मिल्क सँडविच यांना योग्य पद्धतीने सादर करणे महत्वाचे आव्हान आहे.
पल्लवी चक्रवर्ती, एक्झीक्यूटिव्ह क्रीएटिव्ह डायरेक्टर, टॅपरूट देंस्तू, यांनी सांगितले की,लहान मोठे कन्फेक्शनरी
उत्पादन निर्मात्यांमध्ये आपली वेगळी ओळख कायम ठेऊन आपली माईंड स्पेस आणि शेल्फ स्पेस राखणे कठीण आहे.
अश्या परिस्थितीत आम्ही जुन्या कॅम्पेन वरून पुढे नेत काही विनोदी आणि हलक्या जाहिराती तयार केल्या आहेत.
यात विनोद, ब्रँड संदेश आणि गंभीर व्यवसाय हे सर्व समाविष्ट असून त्यामुळे रिब्रान्डींग सोबत ड्युप्लिकेट करणार्यांना
या जाहिराती विचार करायाला भाग पडणार आहे. हिंदी, इंग्रजी, मराठी, तामिळ सहित ११ भाषांमध्ये या जाहिराती
प्रसारित होतील.