नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्या  एनसीसी छात्रसैनिकांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

0
763

                                      

गोवा खबर:ह्या वर्षी नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी झालेल्या गोव्याच्या वेगवेगळ्या महाविद्यालयातील १० एनसीसी धात्रसैनिकांचा राज्यपाल श्रीमती मृदुला सिन्हा यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. केशव कुमार ठाकूर आणि कृष्णा पुजारी डी. एम्स कॉलेज म्हापसा, पुनीती यादव, एमईएस कॉलेज जुवारी नगर, मंजुनाथ लोहार, राकेश नाईक आणि संचना मांद्रेकर, सेंट झेवियर कॉलेज म्हापसा, लिओनार्ड वाज, लॉयला हायस्कूल, मडगांव, मिनाक्षी गोसावी, सरकारी कॉलेज, साखळी आणि शर्मिष्ठा सानियाल, धेंपे कॉलेज, मिरामार यांना प्रत्येकी १२,५००/- रुपयांचा इनाम आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

क्रिडामंत्री  मनोहर आजगांवकर, एनसीसी विभागाचे उपसरसंचालक ब्रिगेडियर पुर्वीमठ, स्टेशन कमांडर ब्रिगेडियर ए.के. शर्मा, संचालक कर्नल अनिरबान दत्ता आणि अन्य अधिकारी यावेळी हजर होते.

या वेळी बोलताना राज्यपाल म्हणाल्या, उद्याचे पुढारी निर्माण करून राष्ट्र बांधणिच्या कामात एनसीसीची भूमिका महत्वाची आहे. एनसीसीच्या माध्यमातून शिस्तप्रिय आणि जाबाबदार नागरिक घडवण्याच काम होत. एनसीसीच्या उपक्रमातून वाईट गुण दूर होतात असे राज्यपाल म्हणाल्या.आजगांवकर यांनी छात्रसैनिकांचे अभिनंदन करून त्यांच्या कौशल्याची प्रशंसा केली.

 ब्रिगेडियर डी. एम. पुर्वीमठ यांनी उपस्थितांच स्वागत करून एनसीसीच्या तुकडीच्या कार्याची माहिती दिली. राज्यपालंनी गोवा एनसीसी तुकडीला मानपत्र प्रदान केली.