नवीन कोरोना विषाणू (COVID-19) आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रवासाविषयक नवी मार्गदर्शक तत्वे जारी

0
614

अफगाणिस्तान, फिलिपीन्स, मलेशिया  या देशातून भारतात येण्यावर त्वरित बंदी

 

 

गोवा खबर:आरोग्य मंत्रालयाने 11 मार्च 2020 आणि 16 मार्च 2020 रोजी जारी केलेल्या प्रवासविषयक मार्गदर्शक तत्वांच्याच पुढचा टप्पा म्हणून आज अतिरिक्त मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. यानुसार-

अफगाणिस्तान, फिलिपीन्स, मलेशिया  या देशातून भारतात येण्यावर त्वरित बंदी घालण्यात आली आहे. या देशातून भारतात आता एकही विमान येणार नाही. सर्व संबंधित विमान कंपन्यांनी याची नोंद घेऊन, उड्डाणे रद्द करायची आहेत.

ह्या सूचना तात्पुरत्या उपाययोजनांचा भाग असून त्या 31 मार्च 2020 पर्यंत लागू राहतील. त्यानंतर त्यांचा फेरआढावा घेतला जाईल.