नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार

0
273

हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकृत

 

 

गोवा खबर:पंतप्रधानांनी केलेल्या शिफारसीनुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्या हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकृत केला आहे. राज्यघटनेतल्या अनुच्छेद 75 मधल्या कलम (2) अनुसार हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. 

याचबरोबर, पंतप्रधानांनी  केलेल्या शिफारसीनुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सध्या असलेल्या खात्याव्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे.