नरकासुर दहनाने गोव्यात दीपावली साजरी

0
679
 गोवा खबर: क्यार वादळाचे संकट दूर झाल्यानंतर पावसाने काढता पाय घेतल्याने गोव्यात आज नरकासुर दहनाने मोठ्या उत्साहात दीपावली साजरी करण्यात आली.

सप्टेंबर महीना संपून देखील तब्बल 15 दिवस रेंगाळलेला परतीचा पाऊस आणि क्यार वादळामुळे झालेल्या पावसामुळे यंदाच्या दीपावलीवर पावसाचे संकट होते.शनिवारी क्यार वादळ गोव्यापासून 350 किमी दूर निघुन जाताच गोव्यातील मूसळधार पाऊस थांबला.त्यामुळे शनिवारी दिवसभर नरकासुर वधाचा देखावा उभारणाऱ्या मंडळांनी धावपळ करत उरलेली कामे पूर्ण केली.
शनिवारी रात्री नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.अगदी 1 फूटा पासून 80 फूट ऊंचीचे नरकासुर वधाचे देखावे उभारण्यात आले होते.मळा पणजी येथे उभारलेला 40 फूटी आकाशकंदील अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता.
रविवारी पहाटे नरकासुर दहनाला सुरुवात झाली.पावसामुळे नरकासुर भिजलेले असल्याने त्यांचे दहन करण्यात अडचणी येत होत्या.रॉकेल, पेट्रोल,सुके गवत वापरुन मंडळांनी नरकासुराचे दहन केले.
नरकासुर दहना नंतर अभ्यंग स्नान करून दिप प्रज्वलित करून दीपावली साजरी करण्यात आली.मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी शनिवारी मडगाव येथील हरी मंदीरात जाऊन श्रीकृष्णाची पारंपरिक पद्धतीने पूजा केली.
एकमेकांना शुभेच्छा देत फराळांचे आदान प्रदान करून तसेच आकाश कंदील आणि पणत्या लावून राज्यात दीपावली साजरी केली जात आहे.