पणजी: भारत छोडो आंदोलनाची ७५ वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्त सर्वसामान्य लोकांबरोबर साजरे
करण्यासाठी भारत सरकारने १९ ते २२ सप्टेंबर दरम्यान कला अकादमी, पणजी, गोवा येथे ‘आम्ही घडवणार नवा भारत’
या उपक्रमाचे आयोजन केले होते. या उपक्रमाचे आयोजन संसदीय कामकाज मंत्रालय आणि गेल इंडिया लिमिटेड यांनी
एकत्रितपमे केले होते. भारताला भ्रष्टाचार, कचरा आणि गरिबीमुक्त करण्यासाठी लोकांनी कशाप्रकारे योगदान द्यावे याबद्दल
जागरूकता पसरवणे हा या उपक्रमामागचा हेतू होता.
या चार दिवसीय उपक्रमात साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या
प्रदर्शनात भारत छोडो चळवळीचा काळ फोटोंद्वारे उभा करण्यात आला व त्याला दृकश्राव्य कार्यक्रमाचीही जोड देण्यात
आली होती.
या कार्यक्रमाद्वारे स्वातंत्र्याचा लढा आणि देशाचे स्वच्छ, शिक्षित, निरोगी आणि भ्रष्टाचारमुक्त भविष्य दाखवण्यात आले.