द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिवल 2018 मध्ये चाखा औषधी फेणी!

0
1100

गोवा खबर :गोवा पर्यटन खात्यातर्फे ‘द स्पिरीट ऑफ गोवा फेस्टिवल 2018’चे उद्घाटन करण्यात आले असून, शुक्रवारी पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांच्याहस्ते करण्यात आले. डी.बी बांदोडकर मैदानावर हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

उद्घाटन सोहळ्याला पर्यटनमंत्री आजगांवकर यांच्या  सोबत गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल   पणजीचे महापौर विठ्ठल चोपडेकर, अबकारी खात्याचे आयुक्त अमित झा, पर्यटन खात्याचे संचालक मेनिनो डिसोझा व इतरआदी पदाधिकारी उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱया या महोत्सवात गोव्यातील सर्वात आवडीचे खाद्यपदार्थ म्हणजे नारळ आणि काजूपासून बनवलेली विविध उत्पादने, जेवण, ड्रिक्स, हस्तकारागिरीच्या वस्तू, इत्यादी पारंपारीक रुपात सादर करण्यात आले आहे. तसेच येथे काजूचे फेणीमध्ये रुपांतर करण्याच्या गाळणीच्या प्रक्रियेची प्रात्यक्षिका देखील येथे दाखविण्यात येत आहे. जेवणाखेरीज, मनोरंजन, कार्यशाळा आणि स्पर्धांची धमाल देखील रसिकांना अनुभवता येणार आहे.

पारंपरिक काजू आणि माडाची फेणी जगभरात प्रसिद्ध आहे. या फेणीची चव घेण्यासाठी देशी-विदेशी पर्यटक मोठय़ा प्रमाणात गोव्यात येतात. या महोत्सवात औषधी फेणीला प्रथम स्थान देण्यात आले असल्याचे प्रतिपादन पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.  समुद्रकिनाऱयावर पर्यटकांना सतावणाऱया विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचा आदेश आपण पोलीस तसेच पर्यटन पोलिसांना दिला आहे, असे ते म्हणाले.

पहिल्या आणि दुसऱ्यादिवशी पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात महोत्सवाला गर्दी केली होती. यावेळी लुलु फोर्टेस आणि जुने लॅटिन व कोंकणी संगीताच्या तालावर लोकांनी ठेका धरला. यावेळी गोव्याची प्रसिध्द कलाकार लोर्ना यांच्या उपस्थितीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. तर रात्री ब्रास बँडने पर्यटकांचे मनोरजंन केले.