द टाइल कार्निवलच्या दुसऱ्या अध्यायाचे उद्घाटन 

0
901
Frm right to laft Mr. Tapan k jena , ceo. Mr. Mayank patel - director. Mr. Manoj varmora - manging director. Honourable minister mr. Vijai sardesai - ministery of town and country planning. Shri Govind varmora - founder. Mr. B G varmora - chairman . Mr. Krishnakant bhai from Suryam reality. Mr. Dilip bhai - chamak group ahmedabad
 द टाइल कार्निवलला देशभरातून 1000 पेक्षा जास्त व्यापारी उपस्थित 
गोवा खबर : सनहार्ट सिरॅमिक 23 ते 31 जानेवारी दरम्यान टाइल महाकार्निवलच्या दुसऱ्या अध्यायाचे आयोजन गोव्यात करण्यात आले  आहे. यासाठी देशभरातून 1000 पेक्षा अधिक व्यापारी उपस्थित  आहेत. आरोसिम बीच, कान्सौलीम, दक्षिण गोवा येथील पार्क हयात रिसॉर्ट अँड स्पा मध्ये 20000 स्क्वे फुटावर प्रदर्शित 16 विविध आकार आणि 800 पेक्षा अधिक नवीन नवोन्मेषपूर्ण डिझाईन्स ते अनुभवत आहेत.शहर आणि ग्रामीण नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्या हस्ते याचे उद्घाटन पार पडले आहे.
क्वांटिको या ब्रँडखाली 9 एमेम जाडीची 800×1600एमएम आकाराची फ्लेक्सी टाइल तसेच अॅक्सी मार्बल व्हर्टिकल या ब्रँडखाली 6 एमेम जाडीची 600×1200 आकारातील स्लिम टाईल्स सनहार्ट सिरॅमिक बाजारात उतरविणार आहे.
या कार्यक्रमाअंतर्गत पाहुण्यांना वॉटरस्पोर्ट्स, कासिनो, बीच पार्टी अशा झपाटून टाकणाऱ्या अनुभवांचा लाभ घेता येईल तसेच जागेवरच सोने, स्कूटर्स, कार्स, एसयूव्हीज् अशी बक्षिसे जिंकण्याची संधीदेखील उपलब्ध आहे.
या कार्यक्रमाबद्दल आपले विचार मांडताना अध्यक्ष बी. जी. वारमोरा म्हणाले “अॅक्सी मार्बल हा ब्रँड घेऊन भारतीय टाईल बाजारात पदार्पण केल्यानंतर 1200×1200एमएम आणि 1200×2400एमएम अशा मोठ्या टाइल्सच्या विक्रीत कंपनीची झपाट्याच्या वेगाने वृद्धी होत आहे. ते पुढे म्हणाले “नजीकच्या भविष्यात 600×1200 एमएम आकाराप्रमाणेच 800×1600 एमएम आकार हे एक जोरात चालणारे उत्पादन असेल.” .
 तपन जेना,मुख्य कार्यकारी अधिकारी, सनहार्ट सिरॅमिक म्हणाले ” मागच्या वर्षात नोटाबंदी आणि जीएसटी लागू होणे आणि नंतर जीएसटीच्या टक्केवारीतील बदल असे मोठे आघात झालेल्या टाइलच्या बाजारात हा महामेळावा नक्कीच एक क्रांती घडवून आणेल. बाजारात अजून पुष्कळ संधी आहेत आणि आमचा व्यवसाय दृढ करण्याच्या दृष्टीने विविध भागातील ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोचणे गरजेचे आहे.
देशातील क्र.1 ची टाइल निर्यातदार असणारी ही कंपनी एव्हढ्यावरच थांबणार नाही आहे. उच्च मूल्य असणाऱ्या आणि नवोन्मेषी कल्पना असणाऱ्या काही उदायोन्मुखी उत्पादनांवर कंपनी काम करीत आहे आणि परवडणाऱ्या किमतीत मूल्यावर्धित टाइल्स ती ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहे.
सनहार्ट सिरॅमिकने 2010 मध्ये आपला कार्यप्रवास चालू केला. केवळ सात वर्षांच्या कालावधीमध्ये ती भारतातील सिरॅमिक इंडस्ट्रीमधली आघाडीची कंपनी बनली आहे आणि आज ती भारतातील सिरॅमिक इंडस्ट्रीमधली आघाडीच्या 10 टाइल ब्रँडज् मध्ये गणली जाते. इंडस्ट्रीमधल्या सर्वाधिक वेगाने वृद्धी होणाऱ्या कंपन्यांमध्ये सनहार्ट सिरॅमिकचा समावेश होतो आणि तिने देशातील सर्वात मोठा टाइल निर्यातदार म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे. नोटाबंदी,जीएसटी लागू होणे आणि नंतर जीएसटीच्या टक्केवारीतील बदल असे बाह्य बदल घडून देखील यावर्षी सनहार्ट सिरॅमिकची ४०% वृद्धी होत आहे.