‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा

0
854

गोवा खबर : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन उद्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून ‘द अस्पन पेपर्स’ हा उद्घाटनाचा सिनेमा असेल. ‘द अस्पन पेपर्स’ च्या जागतिक प्रिमिअरवेळी सिनेमातील सगळे महत्त्वाचे कलाकार इफ्फीस्थळीउपस्थित राहणार आहेत.

इफ्फीचा उद्घाटन सोहळा व समारोप बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे.  ‘द अस्पन पेपर्स’  हा दिग्दर्शक ज्युलीयन लंडायस यांचा पहिला सिनेमा आहे. उद्घाटनाचा सिनेमा हा इफ्फी ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सक्रीन्सवर दाखविला जाणार आहे. हेन्री जेम्स यांच्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. जोनाथन मेयर्स हे या सिनेमातील प्रमुख अभिनेते आहेत तर ज्योयली रिचर्डसन ह्या प्रमुख अभिनेत्री आहेत.

ज्योयली या इंग्लिश अभिनेत्री आहेत. त्यांनी 1996 पासून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील बहुतेक चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांना यापूवी दोनवेळा गोल्डन ग्लोब नॉमिनेशन प्राप्त झालेले आहे. व्हेनीसमध्ये या सिनेमाचे चित्रिकरण झालेले आहे. हेन्री जेम्स यांनी जिथे कादंबरी लिहिली होती, तिथेच चित्रिकरण केले गेले आहे. फ्रेंच- पॉलिश चित्रपट निर्माते रोमन पोलंस्की यांची कन्या मोर्गाने पोलंस्की हिनेही  ‘द अस्पन पेपर्स’ या चित्रपटात काम केले आहे.