गोवाखबर:हार्ले-डेविड्सन इंडियाने आपल्या ब्रँडच्या ११५व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधत १ ते ३ फेब्रुवारी २०१८
या कालावधीत गोव्यामध्ये सहाव्या वार्षिक इंडिया एच.ओ.जी. रॅलीचे आयोजन केले आहे. विविध
प्रदेशांतील ३० चॅप्टरचे २०००हून अधिक एच.ओ.जी. सदस्य वर्षातील या सर्वांत मोठ्या मोटरसायकल
रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात दाखल झाले.
या तीन दिवसीय उपक्रमात रागाज २ रिचेस या स्थानिक लोकप्रिय बँडसह वॅलन्टाइन शिप्लीचे
माशुप आणि रॅप-स्टार अमनदीप यांचा सहभाग असलेले लाइव्ह संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
आले. या ब्रँडच्या ११५व्या वर्षपूर्तीच्या जल्लोषाला लकी अलीच्या मदहोश संगीताने कळस चढवत या
उपक्रमाची सांगता झाली.
इंडिया एच.ओ.जी. रॅलीच्या ६व्या उपक्रमाच्या आयोजनप्रसंगी हार्ले-डेविड्सन इंडिया अँड चायनाचे
व्यवस्थापकीय संचालक पीटर मॅकेन्झी म्हणाले, “एच.ओ.जी. या नावाने लोकप्रिय असलेला हार्ले ओनर्स
ग्रुप हा जगातील लाखो सदस्यांचा सहभाग असलेले जगातील पहिले सोशल नेटवर्क ठरला आहे. हार्ले-
डेविड्सनची जीवनशैली आणि संस्कृतीचा प्रसार करण्यात एच.ओ.जी.चे महत्त्वाचे योगदान राहिले आहे.
भारतातील बाइकप्रेमींमध्ये आमच्या ब्रँडचा प्रभाव या उत्साही सहभागातून प्रतिबिंबित होतो. दुचाकीप्रती
विशेषतः हार्ले-डेविड्सन मोटरसायकलवरील आपले प्रेम साजरे करण्यासाठी जमलेल्या या रायडरमधील
जल्लोष, आनंद, उत्साह आम्हाला भविष्यात अजूनही भव्यदिव्य रॅलीचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहित
करणारा आहे.”
एक वार्षिक परंपरा म्हणून एच.ओ.जीच्या सदस्यांनी कस्टम बाइक कॉंटेस्टमध्ये सहभागी होत
आपल्या कस्टमाइज्ड मोटरसायकल स्टाइलचे प्रदर्शन घडविले.

सहाव्या वार्षिक इंडिया एच.ओ.जी. रॅलीने भूतानमधील ड्रॅगन चॅप्टरचे सदस्य असलेल्या व भारतात
प्रथमच इंडिया एच.ओ.जी. रॅलीत सहभाग घेण्यासाठी गोव्यात आलेल्या बाइकरचेही स्वागत केले. आपल्या
सदस्यांचा तसेच त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी इंडिया एच.ओ.जी. रॅली एक प्रमुख व्यासपीठ
बनली आहे. वार्षिक बिग-५ (देशातील सर्व पाचही एच.ओ.जी. रॅलीमध्ये सहभाग घेऊन आपला ध्यास व
उत्साह दाखविणारे ५ बिग मेडल कमेंड रायडर) आणि ट्रिपल-५ (सलग तीन बिग ५ ठरलेल्या रायडरना
दिले जाणारे मेडल) या पुरस्कारांसह वर्षभरामध्ये देशातील २१ राज्यांमध्ये सर्व दिशांना प्रवास करणाऱ्या ६२
एच.ओ.जी. सदस्यांना २१/२६५ पिन अँड पिच देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हार्ले-डेविडसन
मोटरसायकलवरून १००००० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणाऱ्या सदस्यांना क्लब१०० म्हणूनही प्रथमच
गौरवण्यात आले.