दोन्ही जिल्हा पंचायतींवर भाजपची सत्ता आणून पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहणार:तानावडे

0
308
गोवा खबर:माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रथम पुण्यतिथी भारतीय जनता पक्षातर्फे मंगळवार 17 मार्च रोजी पाळण्यात येणार असून त्याऐवजी राज्यातील सर्व मतदारसंघात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आले आहेत.भाजपचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी वरील माहिती दिली.
 17 मार्च 2019 रोजी पर्रीकर यांचे निधन झाले होते. त्याला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. 22 मार्च रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत गोव्याची जनता भाजपला मतदान करून पर्रीकरांना खरी आदरांजली वाहणार आहे.
पर्रीकरांनी भाजपसाठी व गोव्यासाठी मोठे योगदान दिलेले असून ते पक्षाच्या तसेच जनतेच्या नेहमीच स्मरणात राहणार आहे. त्याची उणीव पक्षाला नेहमीच भासत असून मुख्यमंत्री डॉ. सावंत हे त्यांच्याच वारसा पुढे नेत प्रशासन चालवत आहेत, असे तानावडे म्हणाले.
प्रत्येक मतदारसंघात तेथील भाजपचे मंडळ कार्यकर्ते, आमदार, मंत्री, पदाधिकारी हे 17 मार्च रोजी पर्रीकरांच्या श्रद्धांजलीचे कार्यक्रम जनतेला सोबत घेऊन करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.