दोनशे रुपयांची नोट गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर चलनात

0
977

500 आणि दोन हजारानंतर अखेर दोनशे रुपयांची नोटही बाजारात येण्यास सज्ज झाली आहे. दोनशे रुपयांची नोट उद्या म्हणजेच शुक्रवारी बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयने ही माहिती दिली.

केंद्र सरकारने दोनशे रुपयांची नोट बाजारात आणण्याची अधिसूचना नुकतीच जारी केली होती.

दरम्यान दोनशेच्या नोटेवर गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या नोटांची मोठ्या प्रमाणात छपाई सुरु आहे. बाजारात आल्यानंतर या नोटेचा तुटवडा जाणवू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे.सध्या १, २, ५, १०, २०, ५०, १००, ५०० आणि २००० या नऊ नोटा चलनात आहेत. आता, सुट्या पैशांचा प्रश्न सोडवण्याचं महत्त्वाचं काम करण्यासाठी २०० रुपयांची नोट उद्यापासून दाखल होतेय. नोटेतील सिक्युरिटी थ्रेडवर ‘भारत’ आणि ‘RBI’ असं लिहिलं आहे. नोट हलवल्यास या अक्षरांचा हिरवा रंग निळा होतो. तसंच, उजव्या बाजूला नोटेच्या खालच्या भागात रुपयाच्या चिन्हासह छापलेला २०० च्या अंकातही रंग बदलणारी शाई वापरण्यात आली आहे.