देशाला एकतेच्या सूत्रात बांधणाऱ्या आधुनिक भारताच्या निर्मात्याला विशेष आदरांजली 

0
1168
The Prime Minister, Shri Narendra Modi dedicates the ‘Statue of Unity’ to the Nation, on the occasion of the Rashtriya Ekta Diwas, at Kevadiya, in Narmada District of Gujarat on October

 

 

1947 च्या पूर्वीचे सहा महिने भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे होते. साम्राज्यवादी शासनासोबतच भारताची फाळणी अंतिम टप्प्यात आली होती. पण, त्यावेळी हे चित्र स्पष्ट नव्हते की, देशाचे एकापेक्षा अधिक वेळा विभाजन होईल. महागाईचा भस्मासूर होता, अन्नधान्याची टंचाई होती, पण या सर्व बाबीतही सर्वात मोठी चिंता होती ती भारताच्या एकतेची, ज्यावर संकट ओढवले होते.

The Prime Minister, Shri Narendra Modi at the inauguration of the Valley of Flowers, during the dedication ceremony of the ‘Statue of Unity’ to the Nation, on the occasion of the Rashtriya Ekta Diwas, at Kevadiya, in Narmada District of Gujarat on October 31, 2018.

या पार्श्वभूमीवर बहुप्रतिक्षीत ‘गृह विभागाची’ स्थापना जून 1947 मध्ये करण्यात आली. या विभागाचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे 550 हून अधिक संस्थांनांसोबत चर्चा करुन त्यांचे भारताविषयीचे नाते जाणून घ्यायचे. या संस्थानांचा आकार, लोकसंख्या, भौगौलिक परिस्थिती आणि आर्थिक स्थिती वेगवेगळी होती. त्यावेळी महात्मा गांधी म्हणाले होते की, ‘‘राज्‍यांची समस्‍या इतकी बिकट आहे की फक्त ‘तुम्हीच’ त्यावर तोडगा काढू शकता’. या ठिकाणी ‘तुम्ही’ म्हणजे दुसरे कोणी नाही तर,  सरदार वल्‍लभभाई पटेल आहेत ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करत आहोत.

 

आपल्या विशिष्ट शैलीने सरदार पटेलांनी अतिशय सुदृढपणे आणि प्रशासनिक दक्षतेच्या जोरावर हे आव्हान पूर्ण केले. अतिशय कमी वेळेत मोठी जबाबदारी होती. पण, ती पूर्ण करणारे कोणी सामान्य व्यक्ती नव्हते तर सरदार पटेल होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्या राष्ट्राला झुकण्याची वेळ येणार नाही, यासाठी ते कटीबद्ध होते. त्यांनी आणि त्यांच्या टीमने एक-एक करुन सर्व संस्थानांशी बोलणी सुरु केली आणि या सर्व संस्थानांना स्वतंत्र भारताचा भाग बनवले.

 

सरदार पटेलांनी पूर्ण निष्ठेने दिवस-रात्र मेहनत करुन हे काम पूर्ण केले. त्यांच्या या कार्यामुळेच आपण आधुनिक भारताचे एकीकृत चित्र पाहत आहोत.

 

असे म्हटले जाते की, व्ही. पी. मेनन यांनी स्वातंत्र्यानंतर शासकीय नोकरीतून निवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर सरदार पटेल त्यांना म्हणाले होते की, ही वेळ आराम करण्याची किंवा निवृत्त होण्याची नाही, असा सरदार पटेलांचा दृढ संकल्प होता. व्ही.  पी. मेनन यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांनी आपल्या ‘द स्टोरी ऑफ द इंटीग्रेशन ऑफ इंडियन स्टेट्स’ या पुस्तकात लिहिले आहे की, कशाप्रकारे सरदार पटेलांनी या मोहिमेत अग्रणी भूमिका घेऊन आपल्या नेतृत्वाखाली पूर्ण टीमला मेहनत करण्यास प्रेरित केले. त्यांनी लिहिले आहे की, सरदार पटेल यांच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण बाब भारतीयांचे हित होती, ज्यावर कसल्याही प्रकारची तडजोड त्यांना मान्य नव्हती.

 

आम्ही 15 ऑगस्ट 1947 रोजी नव्या भारताच्या उदयाचा उत्सव साजरा केला. पण राष्ट्रनिर्मितीचे काम अपूर्ण होते. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री या नात्याने त्यांनी प्रशासनाची घडी बसवण्याचे काम केले जे आजही सुरु आहे. मग हे दैनंदिन शासन संचालन असो वा गरीब आणि वंचितांच्या हितांचे रक्षण करण्याचे काम असो.

 

सरदार पटेल अनुभवी प्रशासक होते. प्रशासनामध्ये त्यांचा अनुभव विशेषतः 1920 च्या दशकातील अहमदाबाद नगरपालिकेतील त्यांची सेवा, स्वतंत्र भारताच्या प्रशासनाला मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरली. त्यांनी अहमदाबादेत केलेले स्वच्छतेचे कार्य प्रशंसनीय आहे. त्यांनी पूर्ण शहरात स्वच्छता आणि जल निःसारण प्रणाली सुरु केली. त्यांनी रस्ते, वीज, शिक्षण या नागरी सुविधांवरही भर दिला.

 

आज सहकार क्षेत्रात भारताची विशेष ओळख आहे याचे श्रेय सरदार पटेलांना जाते. ग्रामीण समुदाय विशेषतः महिला सक्षमीकरणासाठीची त्यांची दूरदृष्टी अमूल योजनेच्या रुपाने दिसून येते. सरदार पटेलांनीच सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विचार लोकप्रिय बनवला आणि यामाध्यमातून अनेकांना सन्मान आणि आश्रय प्राप्त झाला.

 

निष्ठा आणि प्रामाणिकपणा ही सरदार पटेलांची ओळख आहे. भारतीय शेतकऱ्यांची त्यांच्याप्रती प्रचंड आस्था होती. ते शेतकरी कुटुंबातील होते, त्यांनी बार्डोली सत्याग्रहात नेतृत्व केले होते. कष्टकरी वर्ग त्यांच्यात आशेचा किरण पाहत असे, एक असा नेता जो आपल्या बाजूने बोलेल असे त्यांना वाटे. व्यापारी आणि उद्योजकही त्यांच्यासोबत आनंदाने काम करत कारण त्यांना माहित होते की, सरदार पटेल आर्थिक आणि औद्योगिक विकासाची दृष्टी असलेले नेते आहेत.

 

त्यांच्या राजकीय मित्राचांही त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आचार्य कृपलानी म्हणत की, जेंव्हा कधी त्यांना बापूंचे मार्गदर्शन मिळत नसे त्यावेळी ते सरदार पटेलांकडे जात. 1947 मध्ये ज्यावेळी राजकीय परिस्थितीबाबत विचारविनिमय अतिशय निर्णायक अवस्थेत होता, तेंव्हा सरोजिनी नायडूंनी त्यांना ‘‘संकल्‍प शक्ती असणारे गतीमान व्‍यक्ती’’ असे संबोधन वापरले होते.

 

त्यांचे शब्द आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर सर्वांना पूर्ण विश्वास होता. जाती, धर्म, वय या पलिकडे जाऊन सर्व लोक सरदार पटेलांचा सन्मान करत असत.

 

या वर्षीची सरदारजींची जयंती अधिक विशेष आहे. 130 कोटी भारतीयांच्या आशीर्वादाने ‘स्‍टैच्‍यू ऑफ यूनिटी’ चे उदघाटन होत आहे. नर्मदेच्या किनाऱ्यावरील ‘स्‍टैच्‍यू ऑफ यूनिटी’ जगातील सर्वात उंच पुतळ्यांपैकी एक आहे. भूमीपूत्र सरदार पटेल आमची मान गर्वाने उंचावण्याबरोबरच आम्हाला दृढता प्रदान करतील, आम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम प्रेरणा देत राहतील.

 

ज्या लोकांनी या विशाल प्रतिमेला सत्यात उतरवण्याचे काम केले, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. मी 31 ऑक्टोबर 2013 ची आठवण करतो, ज्या दिवशी आम्ही या महत्वाकांक्षी योजनेची पायाभरणी केली होती. विक्रमी वेळेत, एवढे मोठे काम साकार झाले, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटला पाहिजे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, येणाऱ्या काळात ‘स्‍टैच्‍यू ऑफ यूनिटी’ पाहण्यासाठी यावे.

 

‘स्‍टैच्‍यू ऑफ यूनिटी’ सह्रदयता आणि आमच्या मातृभूमीच्या भौगोलिक एकतेचे प्रतीक आहे. आपसात वाद करुन आपण समर्थपणे मुकाबला नाही करु शकणार. एकजूट राहून, आम्ही जगाला सामोरे जाऊ शकतो तसेच विकास आणि गौरवाची नवनवीन शिखरं गाठू शकू.

 

सरदार पटेलांनी वसाहतवादी इतिहास बदलण्यासाठी अभूतपूर्व गतीने काम केले आणि राष्ट्रीयत्वाची भावना जोपासून भूगोल निर्माण केला. त्यांनी भारताला छोट्या राज्यांमध्ये विभाजीत होण्यापासून वाचवले आणि राष्ट्रीय आराखड्यात सर्वात कमकुवत भागालाही जोडले. आज आम्ही, 130 कोटी भारतीय नव्या भारताच्या निर्मितीसाठी खांद्याला खांदा लावून काम करत आहोत, जो मजबूत, समृद्ध आणि समग्र असेल. प्रत्येक निर्णयामागे विकासाचा लाभ भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वात शेवटच्या घटकाला पोहचेल हा दृष्टीकोन आहे, जशी सरदार पटेलांची इच्छा होती.

नरेद्र मोदी

पंतप्रधान