देशात कोविड-19 चे 3,58,692 सक्रीय रुग्ण

0
356


बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 6,53,750 पर्यंत पोहोचली

 

गोवा खबर:देशात कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी, केंद्राच्या मार्गदर्शनाखाली सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी वेळेत, संरक्षक आणि वर्गीकृत धोरणे राबवल्यामुळे, देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली आहे. सध्या देशात उपचार सुरु असलेल्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या 3,58,692 इतकी आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या वाढून 6,53,750 पर्यंत पोहोचली आहे. बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्णांच्या संख्येमधील तफावत सातत्याने वाढते आहे. आज ही तफावत 2,95,058 इतकी आहे. सर्व, 3,58,692  सक्रीय रूग्णांना योग्य वैद्यकीय मदत दिली जात आहे. यांच्यापैकी काही गृह अलगीकरणात तर काही गंभीर रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या समन्वयीत प्रयत्नांतून, कोविड आजाराचे व्यवस्थापन शक्य झाले आहे. केंद्र सरकार सर्व राज्यांना  सातत्याने मदत करत असून, ज्या ठिकाणी कोविडचे अधिक रुग्ण आहेत, अशा ठिकाणी केंद्राने तज्ञांची पथकेही पाठवली आहेत. बिहारमधील कोविड -19 च्या व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि आवश्यक ती मदत देण्यासाठी केंद्र सरकार बिहारला पथक पाठवत आहे. या पथकात, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल, NCDC चे संचालक डॉ एस के सिंग आणि एम्सचे सहयोगी प्राध्यापक डॉ नीरज निश्चल यांचा समावेश आहे,हे पथक उद्या बिहारला पोहोचेल.

प्रतिबंधात्मक धोरणाचा मुख्य भर, घरोघरी जाऊन सर्वेक्षण, विशिष्ट परिघात नियंत्रण कामे, रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा वेळेत शोध, प्रतिबंधक आणि बफर क्षेत्रांमध्ये सर्वेक्षण, गंभीर रुग्णांचे प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यावर राहिला आहे. रुग्णालय पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सातत्याने सुरु असलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून, रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे.

गेल्या 24 तासांत, कोविडचे 17,994 रुग्ण बरे झाले. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 63% इतका आहे.

ICMR च्या चाचणीविषयकच्या ताज्या धोरणानुसार, सर्व वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांना चाचणीची शिफारस करण्याची परवानगी देण्यात आली आहे. RT-PCR आणि रॅपिड अँटीजेन पॉईंट ऑफ केअर टेस्ट,यांच्यासह  TruNat आणि CBNAAT या चाचण्यांमुळे कोविड नमुन्यांच्या चाचण्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 3,61,024 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आतापर्यंत देशात कोविडसाठी एकूण 1,34,33,742 चाचण्या करण्यात आल्या असून, ज्यामुळे देशात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे चाचण्यांची संख्या 9734.6.पर्यंत वाढली आहे.

छोट्या कोविड सेंटर्स सुविधांसाठी म्हणून बंदिस्त निवासी संकुले उभारण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केल्या आहेत. निवासी कल्याण संघटना/ निवासी सोसायट्या/ स्वयंसेवी संघटना अशी सुविधा केंद्रे उभारू शकतात. याची सविस्तर माहिती बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा:

https://www.mohfw.gov.in/pdf/CovidCareFacilityinGatedcomplexes.pdf

मंत्रालयाने कोविड19 साठी बंदिस्त निवासी संकुले तयार करण्याबाबतची नियमावली देखील जारी केली आहे, ती बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

https://www.mohfw.gov.in/pdf/AdvisoryforRWAsonCOVID19.pdf

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी  : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.

https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf.