देशात कोरोना रुग्णांची संख्या 37हजार336 वर

0
502

कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

 

 

गोवा खबर:कोविड-19या साथीच्या रोगाच्या प्रसाराला आळा घालणे, प्रतिबंध आणि व्यवस्थापन यासाठी केंद्र सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मदतीने सातत्याने एकत्रितपणे आणि सर्व स्तरावर उपाययोजना करत आहे. या सर्व उपाययोजना आणि व्यवस्थापनावर सर्वोच्च पातळीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे.

PPE सूट्सचा (म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट–शारिरिक संरक्षक परिधानाचा) योग्य वापर कसा करावा याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने काल अतिरिक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. याआधी मंत्रालयाने, “पर्सनल प्रोटेक्तीव्ह इक्विपमेंटचा सुसंगत वापर” या नावाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचाच हा पुढचा भाग आहे. या सर्व मार्गदर्शक सूचना बघण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.mohfw.gov.in/pdf/AdditionalguidelinesonrationaluseofPersonalProtectiveEquipmentsettingapproachforHealthfunctionariesworkinginnonCOVIDareas.pdf आतापर्यंत देशभरात कोविड-19 चे 9950 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 1061, रुग्ण उपचारानंतर बरे झाल्अयाचे आढळले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 26.65 टक्के इतका आहे. सध्या देशात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या, 37,336 इतकी आहे. कालपासून देशात कोविडच्या 2293 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.

तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: technicalquery.covid19@gov.in आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- ncov2019@gov.in .

कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे. https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .