देशात उपलब्ध औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी सरकारतर्फे कडक पावले

0
942

देशात उपलब्ध असणाऱ्या औषधांची गुणवत्ता तपासण्यासाठी केंद्र सरकार कडक पावले उचलत असल्याचे केंद्रीय रसायन आणि खतं राज्यमंत्री हसमुख मांडवीया यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. 2014-16 या कालावधीत हाती घेण्यात आलेल्या राष्ट्रीय औषधे पाहणीत 3.16 टक्के औषधे प्रमाणीकरण गुणवत्तेची नसल्याचे आढळून आल्याची माहिती त्यांनी दिली. अशा औषधांचे नमुने पुढील कारवाईसाठी संबंधित राज्य परवाना प्राधिकरणाकडे पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.