देशात “उज्वला” योजनेअंतर्गत 25.28 कोटी एलईडी बल्बचे वाटप

0
1175
1 ऑगस्ट 2017 पर्यंत ऊर्जा कार्यक्षम सेवा लिमिटेड अर्थात ईईएसएलने देशात 25.28 कोटी एलईडी बल्बचे वाटप केले असल्याचे ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले. तसेच खाजगी क्षेत्रात देशांतर्गत ग्राहकांना जून 2017 पर्यंत 41.44 कोटी एलईडी  बल्ब विकल्याची माहिती दिली आहे. मार्च 2019 पर्यंत देशातल्या उष्णतेने प्रकाशमान होणाऱ्या बल्बच्या जागी एलईडी दिवे लावण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात वितरित करण्यात आलेल्या 25.28 कोटी एलईडी बल्बमुळे 32.84 अब्ज kWh ची बचत होऊन कार्बन उत्सर्जनात 26.60 दशलक्ष टन घट झाल्याची माहितीही गोयल यांनी या उत्तरात दिली आहे.महाराष्ट्रात 2 कोटी 12 लाख, 92 हजार 816 एलईडी बल्बचे वितरण करण्यात आले. यामुळे दरवर्षी 2 हजार 768.07 MU ऊर्जा बचत झाली. तसेच ऊर्जा मागणीत 553.06 मेगावॅटची घट झाली.