देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये चार टक्क्यांनी वाढ

0
1137
देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 3 ऑगस्ट 2017 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे नोंदविण्यात आले आहे. या जलसाठ्यांमध्ये 67.683 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. जलसाठ्यांच्या एकूण क्षमतेपैकी 43 टक्के जलसाठा आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 157.799 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 27.07 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 14.74 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 54 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हिमाचल प्रदेश, पंजाब, झारखंड,पश्चिम बंगाल, त्रिपुरा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,कर्नाटक आणि छत्तीसगड या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त आहे. तर, राजस्थानमध्ये गेल्या वर्षी या काळात असलेल्या पाणीसाठ्याएवढाच पाणीसाठा आहे. ओदिशा, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा उपलब्ध आहे.