देशातल्या पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन 

0
789

गोवा खबर:केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज नवी दिल्ली येथे देशाच्या विविध भागात आलेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या पूरस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्रीय मंत्रालये/संस्था यांच्या सज्जतेची त्यांनी माहिती घेतली.

गेल्या दोन दिवसात महाराष्ट्रकेरळकर्नाटक या राज्यात अतिशय जास्त पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली. त्याशिवाय गुजरातपश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानात पुढल्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. एनडीआरएफची 83 पथके पुराची झळ पोहोचलेल्या चार राज्यांमध्ये आवश्यक त्या सामुग्रीसह तैनात असल्याची माहिती एनडीआरएफच्या महासंचालकांनी दिली.

त्याचबरोबर लष्करनौदलहवाई दल आणि तटरक्षक दलाच्या 173 तुकड्या या राज्यांमध्ये तैनात आहेत. गृह मंत्रालय,एनडीआरएफभारतीय हवामान विभाग आणि केंद्रीय जल आयोगामधील नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर सातत्याने24X7 लक्ष ठेवले जात आहे. आत्तापर्यंत 82,000 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले असून, पुरात अडकलेल्या 2325 लोकांची सुटका करण्यात आली आहे.

या बैठकीला गृह सचिव, एनडीआरएफचे महासंचालक, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य सचिव, गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, केंद्रीय जल आयोग आणि भारतीय हवामान विभागाचे वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि त्यांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.