देशभरात 7 मार्च 2019 ‘जनऔषधी दिवस’ म्हणून साजरा करणार

0
878


 

 गोवा खबर:सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सरकारने प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेच्या माध्यमातून परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधे सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याचे महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे, असे केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

 

जेनेरिक औषधांविषयी अधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि या औषधांच्या वापराला चालना देण्यासाठी 7 मार्च2019 हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. 7 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील जनऔषधी केंद्रांचे मालक आणि या योजनेच्या लाभार्थींशी दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत, अशी माहिती मांडवीया यांनी दिली.