देशभरातील 308 जिल्ह्यांतील अल्पसंख्याक मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी सरकारचे प्रयत्न: अब्बास नक्वी

0
974
The Union Minister for Minority Affairs, Shri Mukhtar Abbas Naqvi witnessing the MoUs, lamp at the National Conference of Principal Secretaries / Secretaries in-charge of States / UTs dealing with Minority Affairs, in New Delhi on July 16, 2018. The Secretary, Ministry of Minority Affairs, Shri Ameising Luikham and other dignitaries are also seen.

गोवाखबर:केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, देशभरातील 308 जिल्ह्यांतील अल्पसंख्याक मुलींच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी सरकार युद्धपातळीवर पायाभूत सुविधा पुरवत आहे.

ते आज अल्पसंख्याक विभागाशी निगडीत मुख्य सचिव, प्रभारी अधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. याप्रसंगी बोलताना नक्वी म्हणाले की, केंद्र सरकार अल्पसंख्याक मुलींचे शिक्षण, रोजागराभिमुख कौशल्यविकास यादृष्टीने शाळा, महाविद्यालय, तंत्रनिकेतन, मुलींचे वसतीगृह, आयटीआय, कौशल्य विकास केंद्र प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत विकसित करत आहे. स्वातंत्र्यापासून मागास राहिलेल्या भागांवर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.

मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, साधनांच्या अभावामुळे अल्पसंख्याकांमध्ये विशेषतः मुस्लीम मुलींमध्ये साक्षरतेचा दर कमी आहे. गेल्या चार वर्षात एमएसडीपी अंतर्गत, 16 पदवी महाविद्यालये, 2019 शाळा इमारती, 38, 736 वर्गखोल्या, 1141 वस्तीगृह, 170 आयटीआय, 48 तंत्रनिकेतन, 38,736 अंगणवाड्या, 3,48,624 इंदिरा आवास योजना (प्रधानमंत्री आवास योजना) घरं, 340 सदभावना मंडप, 67 निवासी शाळा, 436 बाजार निवारे, 4436 आरोग्य प्रकल्पांची निर्मिती मोदी सरकारच्या काळात झाली आहे. यामुळे मागासवर्गाच्या विशेषतः अल्पसंख्यांक महिलांच्या आयुष्यात चांगले परिवर्तन घडून आले आहे.

केंद्रीय मंत्री नक्वी पुढे म्हणाले की, प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रम हा सन्मानासह विकास, आणि सर्वसमावेशी विकास ही आश्वासनं प्रभावी ठरली आहेत. प्रधान मंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत 80 टक्के साधनं शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य विकासाशी संबधित आहेत. यापैकी 33 ते 40 टक्के साधनं महिला केंद्री प्रकल्पांशी संबंधित आहेत.

केंद्र सरकारच्या ‘सिखो और कमाओ’, ‘उस्ताद’, ‘गरीब नवाज कौशल्य विकास योजना’, ‘नई मंजिल’, ‘नई रोशनी’, ‘बेगम हजरत महल मुलींसाठी शिष्यवृत्ती’, यामुळे अल्पसंख्यांक समुदायातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळाली आहे.

श्री नक्वी म्हणाले की, गेल्या चार वर्षात 2 कोटी 66 लाख विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीचा लाभ झाला आहे. रोजगाराभिमुख कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत5 लाख 43 हजार युवकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. 17 राज्यांच्या मुख्य सचिव आणि अल्पसंख्यांक विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची या परिषदेला उपस्थिती होती.