देवेंद्र आणि सरदार सिंग यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

0
991
क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्रीडापटूंना दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षीच्या (2017) राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली.

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा देवेंद्र आणि सरदारसिंग या दोघा क्रीडापटूंची निवड करण्यात आली आहे. यंदा सात जणांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तर 17 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ध्यानचंद पुरस्कारासाठी तीन क्रीडापटू निवडण्यात आले आहेत.

या पुरस्कारांचे वितरण येत्या 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांना पदक, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देण्यात येते. यामध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्यांना साडेसात लाख रुपये तर अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना पाच लाख रुपये पुरस्कार म्हणून देण्यात येणार आहे.

(i)        राजीव गांधी खेल रत्न 2017

 

. क्र. पुरस्कारप्राप्त खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1. श्री देवेंद्र पॅरा ऍथलीट
2. श्री सरदार सिंग हॉकी

 

(ii)        द्रोणाचार्य पुरस्कार 2017

 

. क्र. पुरस्कारप्राप्त खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1. दिवंगत डॉ आर. गांधी ऍथलेटीक्स
2. श्री हिरा नंद कटारीया कबड्डी
3. श्री जी एस एस व्ही प्रसाद बॅडमिंटन (जीवनगौरव)
4. श्री ब्रीज भूषण मोहंती बॉक्सिंग (जीवनगौरव)
5. श्री पी. ए.राफेल हॉकी (जीवनगौरव)
6. श्री संजय चक्रवर्ती नेमबाजी (जीवनगौरव)
7. श्री रोशन लाल कुस्ती (जीवनगौरव)

 

 

(iii)       अर्जुन पुरस्कार 2017

 

अ.क्र. पुरस्कारप्राप्त खेळाडूचे नाव क्रीडा प्रकार
1. श्रीमती व्ही.जे.सुरेखा नेमबाजी
2. श्रीमती खुशबीर कौर ऍथलेटीक्स
3. श्री अरोकीया राजीव ऍथलेटीक्स
4. श्रीमती प्रशांती सिंग बास्केटबॉलl
5. लैशराम देवेंद्र सिंग बॉक्सिंग
6. श्री चेतेश्वर पुजारा क्रिकेट
7. श्रीमती हरमनप्रीत कौर क्रिकेट
8. श्रीमती ओईनामबेमबेम देवी फुटबॉल
9. श्रीमती एस एस पी चौरासिया गोल्फ
10. श्री एस.व्ही सुनील हॉकी
11. श्री जसवीर सिंग कबड्डी
12. श्री पी एन प्रकाश नेमबाजी
13. श्री ए अमालराज टेबल टेनिस
14. श्री साकेत मेनी टेनिस
15. श्री सत्यव्रत कादीन कुस्ती
16. श्री मरीयप्पन पॅरा-ऍथलीट
17. श्री वरुण सिंग बाहेती पॅरा-ऍथलीट

 

 

(iv)       ध्यानचंद पुरस्कार

 

. क्र. नाव क्रीडा प्रकार
1 . श्री भूपेन्दर सिंग ऍथलेटीक्स
2. श्री सय्यद शाहीद हकीम फुटबॉलl
3. श्रीमती सुमराई तेते हॉकी