दृष्टी मरिनची गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्मसध्ये नोंदणी

0
844

 

 

~ रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन व जलसंपत्ती, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरीने दृष्टी मरीनचे गिनिस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदणी झाल्याबद्दल त्यांना गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. रेसिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.~

~इंडियन ग्रॅन्ड प्रिक्स ऑफ सिसच्या नेक्सा पी1 पॉवरबोटमध्ये ब्युओसची सर्वांत मोठी साखळी केल्याबद्दल त्यांचे नाव गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्मध्ये नोंदवण्यात आले.~

~पाण्यावरील रेस कोर्सवर दृष्टीला 11.46 कि.मी.चा ब्युओस करण्यासाठी त्यांना 3 आठवड्याहून अधिक काळ लागला. या स्तरावर असे घडणे ही आतापर्यंतची प्रथमच घटना.~

 

 

 

गोवा खबर:पहिल्यांदाच पाण्यावर दृष्टी मरीनने आज इंडियन ग्रॅन्ड प्रिक्स ऑफ सिसच्या नेक्सा पी1 पॉवरबोटमध्ये सर्वांत लांब ब्युओसची साखळी तयार करून गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाची नोंदणी केली.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन व जलसंपत्ती, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरीने दृष्टी मरीनचे गिनिस वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदणी झाल्याबद्दल दृष्टी मरीनचे अध्यक्ष राजीव सोमानी व दृष्टी मरीनचे व्यवस्थापकीय संचालक अंकित सोमानी यांना गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. रेसिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे.

अभूतपूर्व कृती बनवण्याच्या वंशाच्या परिणामी भारताच्या अग्रगण्य क्रीडा व्यवस्थापन कंपनी प्रोकॅम इंटरनेश्नलसाठी या कोर्सची निर्मिती झाली. दृष्टी मरिनने पाण्यात 11.46 कि.मी. च्या ब्युओसच्या साखळी तयार केली.

 

दृष्टी मरिनचे व्यवस्थापकीय संचालक अंकित सोमानी 60 कामगारांच्या सहाय्याने मुंबईमध्ये जागतिक चॅम्पियनशीप मालिकेच्या उद्घाटनानिमित्त रेसींग कोर्स बांधण्यात आले.

दृष्टी मरिनने जगातील पाणण्यावरील पहिल्या रेस ट्रॅक बनवण्याचा विडा उचलला. या स्तरावर असे हे पहिल्यांदाच घडले आहे. अंकित सोमानी 60 कामगाराच्या सहाय्याने 3 आठवड्यात 11.46 कि.मी. ब्यओस करून पाण्यावर 5.3 कि.मीचा रेस कोर्स तयार केला. 5700 ब्युओस किंवा पाण्यावर तरंगते फुग्यांच्या सहाय्याने तयार करण्यात आला होता.

 

 

गिनेस वर्ल्र्ड रेकॉर्डने पुनरावलोकन आणि मूल्यमापन पूर्ण करणाऱ्या दृष्टी मरिनचे रेकॉर्डमध्ये नोंदणी केल्याबद्दल अभिनंदन केले.

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन व जलसंपत्ती, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दृष्टी मरिनला पॉवर बोट रेसिंगमध्ये भारताचे नाव उंचावल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. 

 

या यशप्राप्तिबद्दल फार आनंद होत आहे. दृष्टी मरिनसाठी ही चांगली गोष्ट आहे. जागतिक स्तरावर काही तर वेगळे करण्यासाठी आम्हाला खूप नाविन्यपूर्ण व सुधार करावे लागले. असे मत दृष्टी मरिनचे व्यवस्थापकीय संचालक अंकित सोमानी व्यक्त केले.

 

प्रोकॅम इन्टरनेश्नलचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंग यांनी दृष्टी मरिनचे अभिनंदन केले व म्हणाले, पॅरामिटर्समुळे दृष्टीकोन तयार होतो व तो खेळाचा भाग बनतो व यामुळेच आम्हाला पाण्यावर रेस ट्रॅक बांधण्याची उत्सुकता होती. पॉवरबोटींग समुदायाच्या उत्कृष्ट स्वागतानंतर आम्हाला फार अभिमान वाटतो कि आम्ही जगात एक नाव कमवलेले आहे व त्याला गिनिसची ओळख मिळाली आहे. प्रोकॅमला दृष्टी शिवाय मोठी कंपनी मिळाली नसती ज्यामुळे मरिन खेळातील स्वप्न पूर्ण होऊ शकले असते. अंकित व त्याच्या टीमने उत्कृष्ठ प्रदर्शन केले व मरिन खेळातील विलक्षण वास्तविकतेकडे घेऊन गेले.

 

रेस ट्रॅक बांधण्या व्यतिरिक्त दृष्टी मरिनने 2017 मध्ये मुंबई येथील मरिन ड्राईव झालेल्या नेक्सा पी 1 पॉवरबोटमध्य पाण्यावरील सर्व गरजेच्या वस्तू देऊन सुरक्षिततेवर सल्ला दिला होता.

 

गिनेस रेकॉर्डसाठी विविध नियम व गरज असलेले पुरावे पाहिजे ज्यामुळे प्रत्येक जण एकाच परिस्थितीत कला सादर करू शकेल. ज्याप्रमाणे प्रत्येक रेकॉर्ड्स हे त्यांच्या रेकॉर्ड करणाऱ्यांप्रमाणेच वेगळे आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक टाइटल्ससाठी विशिष्ट नियम आहेत. दृष्टी मरिनला दोन पडताळणी प्रक्रियेतून जावे लागले. पहिली पडताळणी प्रक्रिया ही स्वतंत्र पडताळणी प्रक्रिया होती. या प्रक्रियेत प्रयत्नांना पूर्णपणे गिननेस वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे व याची पुष्टी करण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्र साक्षीदारांची उपस्थिती आवश्यक आहे. दुसऱ्या प्रक्रियेत प्रूफ ऑफ मेजरमेंट जिथे सर्व रेकॉर्ड हे मापावर आधारित आहे. दृष्टी मरिनच्या बाबतीत ब्यओसची संख्या व रेस ट्रॅकची लांबी मोजली गेली. या मापांची अचूकता सर्वोच्च आहे.