दुचाकी आणि ऑटो रिक्षाला अटल सेतूवर बंदी का: आपचा सवाल

0
972
गोवा खबर:दुचाकी आणि ऑटो रिक्षाला  तीसऱ्या मांडवी पुलावर बंदी का याची कारणे सरकारने द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. दुचाकी आणि रीक्षांना या पुलाचा वापर  का करु दिला जात नाही याचे उत्तर पारदर्शकतेच्या नावाखाली समजुन घेण्याचा आमचा यत्न आहे असे आम आदमी पार्टीचे राज्य सरचिटणीस प्रदीप पाडगांवकर यानी म्हटले आहे. 
सामान्य आणि गरीब माणुस जो मोटरसायकल आणि ऑटो रिक्शाचा मुख्य वापरकर्ता त्याच्या विरुद्ध ही पोकळ घोषणा भेदभाव करणारी आहे असा आरोप पाडगांवकर यानी केला आहे.
“दुचाकीस्वार आणि रीक्षाचालक जे सामान्य आणि गरीब लोक आहेत त्यांना कोणतेही कारण न देता मांडवी नदीवरील नवीन पुलाचा वापर करु न देणे हे अन्यायकारक आहे. हा पुल फक्त अति श्रीमंत आणि जुगारी लोकांना त्यांच्या पुड्डुचेरी रेजिस्ट्रेशन असलेल्या महागड्या गाड्या मोपातील ‘लास गोआस’ इथपर्यंत अतिवेगाने पळवता याव्यात याकारणास्तव बनवलेला आहे. दुचाकी व रिक्षावाला सामान्य सामान्य माणुस या सरकारसाठी तुच्छ आहे”, असेही पाडगांवकर यांनी नमुद केले.