दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1आयचे यशस्वी प्रक्षेपण

0
1098

 

श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरुन आज इस्रोने आयआरएनएसएस-1आय या दिशादर्शक उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. आज पहाटे 4 वाजून 4 मिनिटांनी 425 किलो वजनाचा हा उपग्रह पीएसएलव्ही-सी4एल या प्रक्षेपकाच्या सहाय्याने अंतराळात प्रक्षेपित केला.

आतापर्यंत पीएसएलव्हीने 52 भारतीय आणि 237 परदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

आयआरएनएसएस-1आयच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन
दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1 आयच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.

दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-1आयपीएसएलव्हीच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी आपल्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करतो. या यशाचा फायदा आपल्या अंतराळ कार्यक्रमासह सामान्य जनतेला देखील होणार आहे. इस्रोच्या टिमचा आम्हाला अभिमान आहे’ असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.