दिव्यांग व्यक्तींकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज

0
403

गोवा खबर: समाज कल्याण संचालनालयाने विविध शाळा, महाविध्यालय आणि संस्थेत शिकणा-या दिव्यांग विध्यार्थ्यांना विध्यावेतन आणि शिष्यवृत्ती देण्यासाठी कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी केली आहे.

दिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० टक्के किंवा त्याहून जास्त दिव्यांग असलेला वैध्याकिय मंडळाचे प्रमाणपत्र असावे. तसेच मागील परिक्षेत किमान ४० टक्के गूण मिळविलेले असावे त्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १.५० लाखापेक्षा जास्त नसावे. समाज कल्य़ाण संचालनालयाचे ओळख पत्र त्यांच्याकडे असावे.

 मान्यताप्राप्त शिक्षण मंडळ किंवा विध्यापिठातर्फे संगीत आणि व्यावसायिक वर्गाचे शिक्षण घेणा-यांना शिष्यवृत्तीही देण्यात येते.

समाज कल्याण संचालनालय, १८ जून मार्ग पणजी गोवा येथून १ ऑगस्टपासून कोणत्याही कार्यालयीन वेळेत अर्ज मिळविता येतात. त्याचप्रमाणे www.socialwelfare.goa.gov.in या संकेत स्थळावरही अर्ज उपलब्ध आहेत.

शिष्यवृत्ती, विध्यावेतनासाठीचे अर्ज सादर कार्यालयात संबंधित शाळा, महाविध्यालय आणि संस्थेच्या प्रमुखांच्या शिफारसीमार्फत ३० सप्टेंबरपूर्वी सादर करावे.

अधिक माहितीसाठी खास दिव्यांग सशक्तीकरण कक्षांच्या प्रमुखांकडे, दूरध्वनी क्रमांक ०८३२-२२३२२५७,२२२३७८४, फॅक्स क्रमांक ०८३२-२२२८१७२ वर संपर्क साधावा किंवा socialwelfaregoa@rediffmail.com वर भेट द्यावी.