दिव्यांग अंगणवाडी सेविका गावकर यांची बदली रद्द करा:शिवसेना

0
1045
गोवा खबर:गुळेली सत्तरी येथील अंगणवाडी सेविका लता गांवकर ह्या विकलांग महीलेची तडकाफडकी केलेली बदली रद्द करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
आज शिवसेना गोवा राज्य प्रमुख जितेश कामत, सरचिटणीस मिलिंद गावस आणि उत्तर जिल्हा प्रमुख सुशांत पावसकर यांनी महीला व बालकल्याण संचालनालयाच्या संचालिका दिपाली नाईक यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
 शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी  गुळेली येथील लता गांवकर यांच्या घरी भेट घेऊन त्यांची परीस्थिती जाणून घेतली.त्यांच्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती शिवसेनेने संचालिका नाईक यांना दिली.
नाईक यांनी ही बदली राजकीय प्रेरीत असल्याचे नाकारत ही बदली खात्याच्या काही कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची माहिती दिली असे कामत यांनी सांगितले. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून निर्णय घेणार असून लता गांवकर यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे नाईक यांनी स्पष्ट केल्याची माहिती शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी दिली आहे.
 विकलांग कर्मचाऱ्यांची बदली राहत्या ठिकाणापासून जवळ करणे बंधनकारक असुन असे प्रकार घडणे दुदैवी असल्याचे मत कामत यांनी व्यक्त केले आहे.