दिवसा 100 टक्के नवीकरणीय उर्जेवर चालणारी पहिली स्मार्ट सिटी बनण्याचा मान दीवकडे 

0
952

 

 

 

 

गोवाखबर:दिवसा 100 टक्के नवीकरणीय उर्जेवर चालणारे देशातली पहिले स्मार्ट सिटी बनण्याचा मान दीवने पटकावला आहे. याद्वारे स्वच्छ आणि हरित शहरे बनण्यासाठी दीवने इतर शहरांसाठी आदर्श घालून दिला आहे. गेल्यावर्षीपर्यंत दीव, गुजरातकडून 73 टक्के उर्जा घेत होते. यासंदर्भात, दीवमधे 50 हेक्टर, खडकाळ जमिनीवर 9 मेगावॅट सौर पार्क उभारण्याबरोबरच 79 सरकारी इमारतींवर सौर पॅनेल उभारुन त्याद्वारे वार्षिक 1.3 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येते.

सौर क्षमता आणखी वाढविण्यासाठी दीवने आपल्या रहिवाश्यांना घराच्या छपरावर 1 ते 5 मेगावॅट सौर पॅनेल बसवण्याकरिता 10 हजार ते 50 हजार अनुदान देऊ केले आहे. कमी खर्चातल्या सौर ऊर्जेमुळे घरगुती वीज दरात गेल्यावर्षी 10 टक्के तर यावर्षी 15 टक्के कपात झाली आहे.