दावे निकाली काढण्यासाठी दूरसंचार विभागाची मार्गदर्शक तत्त्वे

0
870

अपघातांच्या नुकसान भरपाईचे दावे निकाली काढण्यासाठी दूरसंचार विभागाने मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. जेणेकरून न्यायालयांच्या हस्तक्षेपाशिवाय पीडितांच्या कुटुंबांना थेट नुकसान भरपाई देता येईल. 1 डिसेंबर 2016 पासून ही मार्गदर्शक तत्त्वे लागू झाली आहेत.

मृत्यू अथवा कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये नुकसान भरपाई आणि विभागाकडून जनहितार्थ काही कामे सुरू असताना त्यातून एखादा अपघात होऊन कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 7 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची तरतूद या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आहे. विविध कल्याणकारी नियमांतर्गत दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई व्यतिरिक्त ही नुकसान भरपाई असेल.

विभागाच्या संकेतस्थळावर www.dot.gov.in सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत.