दामोदराचा आशीर्वादाने मडगावातील येणारे नागरमंडळ परतही आमचेच : विजय सरदेसाई

0
86
गोवा खबर : मडगाव आणि फातोर्डा या दोन्ही शहरांचा ग्रामदेव असलेल्या श्री दामोदराचा आम्हाला आशीर्वाद आहे त्यामुळे यावेळीही मागच्याप्रमाणेच आम्ही मडगाव पालिकेत आमचे नागरमंडळ स्थापन करू असा विश्वास गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केला.
जांबावली गुलालोत्सवाच्या पूर्वसंध्येस सोमवारी सरदेसाई यांनी आपल्या फातोर्डा फॉरवर्डच्या 13 उमेदवारासह जांबावली येथे जाऊन श्री दामोदराचे दर्शन घेतले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, फातोर्डाचा सर्वांगीण विकास हे ध्येय नजरेसमोर ठेवून आम्ही पालिका निवडणुकीत पॅनल उतरविले आहे. त्यातील 70 टक्के चेहरे नवीन आहेत. सर्व समाजाना या पॅनेलमध्ये प्रतिनिधीत्व देण्यात आले असून भविष्यात फातोर्डा एक आदर्श शहर घडवून आणण्यासाठी आम्ही सारे कटिबद्ध आहोत असे त्यांनी सांगितले.
सध्याचे सरकार लोकविरोधी असून ते बदलण्यासाठी आम्ही टीम गोवा हे आंदोलन हाती घेणार असून ही पालिका निवडणूक त्याची सुरवात असेल असे ते म्हणाले.