दाबोळी विमानतळ ठरतोय सोने तस्करांच्या पसंतीचा विमानतळ;कस्टमने जप्त केले साडे 26 लाखांचे सोने

0
1017
गोवाखबर:दाबोळी विमानतळावरन होणारी सोन्याची तस्करी अजुन देखील सुरुच आहे.गेल्या आठवड्यात झालेल्या मोठ्या कारवाई नंतर काल पुन्हा 26.40 लाख रूपये किमतीचे तस्करीचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम विभागाच्या दाबोळीतील  पथकाने बुधवारी ही कारवाई केली. विमानाच्या सीट खालील एअरबॅगच्या पॉकेटमध्ये अज्ञात हवाई प्रवाशांनी 928 ग्रॅम वजनाचे सोने तस्करीच्या हेतूने ठेवले होते. मात्र,ते सोने सोबत घेऊन विमानतळाबाहेर पडण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही.
दाबोळी विमानतळावरील कस्टमच्या  पथकाला तस्करीच्या सोन्याची गोवामार्गे हवाई वाहतूक होणार असल्याची पक्की खबर मिळाली होती. त्यानुसार या पथकाने प्रवाशांवर पाळत ठेवली होती. त्याचाच भाग म्हणून दुबईहून दाबोळी विमानतळावर दाखल झालेल्या एअर इंडियाच्या विमानाची या पथकाने झडती घेतली असता या विमानाच्या एका  सीटखालील एअरबॅगच्या पॉकेटमध्ये दोन छोटय़ा पॅकेटमध्ये दहा तोळ्याची 8 सोन्याची बिस्किटे आढळून आली. हे सोने 928 ग्रॅम वजनाचे  आहे. हे सोने कस्टमच्या अधिकाऱयांनी जप्त करून त्या प्रवाशाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवासी सापडू शकला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26.40 लाख रूपये आहे.