दाबोळी विमानतळावर 26 लाखांचे सोने जप्त

0
913

गोवा खबर:दाबोळी विमानतळावरील कस्टम विभागाच्या अधिकाऱयांनी सोमवारी रात्री आपल्या नियमित तपासणीच्यावेळी धावपट्टीवर थांबलेल्या एअर इंडियाच्या एआय-994 या विमानामध्ये जाऊन तपासणी केली असता, या विमानाच्या शौचालयात आढळलेल्या  कमरपट्टय़ात 929 ग्रॅम वजनाचे सोने आढळून आले.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाखांहून अधिक आहे.

अधिकाऱयांनी संशयानेच कमरपट्टा फाडला असता त्यात पावडरच्या स्वरूपात सोने आढळून आले. त्यामुळे अधिकाऱयांनी हा ऐवज जप्त केला. चौकशीत हे सोने 929 ग्रॅम वजनाचे असल्याचे आढळून आले. अधिकाऱयांनी या कमरपट्टय़ाबद्दल चौकशी करताना हवाई प्रवाशांना विचारले असता कुणीच या कमरपट्टय़ावर दावा केला नाही. त्यामुळे अधिकाऱयांना संशयित हवाई प्रवाशाला ताब्यात घेणे शक्य झाले नाही.

गोवा कस्टम विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाखांहून अधिक आहे.गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. पी. राघवेंद्र व एन. जी. पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कस्टम कायदय़ानुसार गोवा कस्टम विभाग अतिरिक्त कस्टम आयुक्त टी. आर. गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

सहा महिन्यात 1 कोटी 30 लाखांचे सोने जप्त

गोवा कस्टम विभागाने मागच्या एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत हवाई प्रवाशांनी अवैधमार्गाने भारतात आणलेले 1 कोटी 30 लाखांचे सोने, चौदा लाखांचे विदेशी चलन तसेच जवळपास 25 लाखांचे अन्य व्पापारी साहित्य जप्त करण्याची कारवाई केलेली आहे