दाबोळी विमानतळावर हवाई प्रवाशाकडून 14 लाखांचे विदेशी चलन जप्त

0
1058

 

 

गोवा खबर:एअर इंडियाच्या विमानातून बेंगलुरु येथून गोवा मार्गे दुबई येथे जाणाऱ्या प्रवाशाकडून गोवा कस्टमच्या अधिकाऱ्यांनी 14.08 लाख भारतीय मूल्य असलेले विदेशी चलन जप्त केले.
एअर इंडियाच्या AI-993 या बेंगलुरु येथून गोवा मार्गे दुबईला जाणाऱ्या हवाई प्रवाशाकडे विदेशी चलन असल्याची माहिती गोवा कस्टमला खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली होती.काल हे विमान दाबोळी विमानतळावर उतरले तेव्हा गोवा कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्या हवाई प्रवाशाची झडती घेतली असता त्याच्याकडे 76,115 रक्कममेचे विदेशी चलन सापडले. भारतीय रुपयांमध्ये त्याचे मूल्य 14.08 लाख रुपये इतके आहे.कस्टम विभागाने विदेशी चलन जप्त करून पुढील तपास सुरु केला आहे.


दाबोळी विमानतळावरील गोवा कस्टम विभागाने 2018-19 मध्ये 1 कोटी रुपयांचे 3.05 किलो सोने,14.08 लाख रुपयांचे विदेशी चलन आणि 36.57 लाख रुपयांचे व्यवसायिक साहित्य जप्त करण्यात यश मिळवले आहे.