दाबोळी विमानतळावर मिग 29 के कोसळून अपघात,पायलट सुरक्षित बचावला

0
1016


गोवा खबर:नौदलाच्या दाबोळी विमानतळावर आज दुपारी मिग 29 के लढाऊ विमान कोसळून अपघात झाला.कोसळताच विमानाने पेट घेतला मात्र प्रसंगावधान राखून पायलट सुखरूपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.
मिग 29 के कोसळल्या नंतर काही काळ दाबोळी विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती.सुरक्षात्मक उपाय योजल्या नंतर धावपट्टी पुन्हा खुली करण्यात आली.
मिग 29 के विमान कोसळल्या नंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे दाबोळी विमानतळावरुन उड्डाण करणारी काही विमाने उशीराने सोडण्यात आली.