दाबोळी विमानतळावरुन सोन्याची तस्करी सुरुच दोघा हवाई प्रवाशांना अटक, महसूल संचालनालयाची कारवाई

0
1117
गोवा:दाबोळी विमानतळावरुन होणारी सोन्याची तस्करी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही.कस्टम विभागाने अनेकदा तस्करीचे प्रकार उघड़ करून कोट्यवधी रूपयांचे सोने जप्त केले असून अनेकांना अटक देखील झालेली आहे.मात्र हे सोने कोण पाठवतो आणि कोणाकडे जाते याचा थांगपत्ता मात्र लागलेला नाही.केंद्रीय महसुल संचालनालयाने काल मोठी करवाई करत जवळपास एक कोटीचे सोने जप्त केले शिवाय दोघांना अटक करण्यात यश मिळवले आहे.केंद्रीय महसुल संचालनालयाचे अधिकारी तरी या तस्करीच्या मास्टर माइंड पर्यंत पोचण्यात यशस्वी होतात का,याकडे सगळ्यांचे लक्ष लागुन राहिले आहे.
केंद्रीय महसूल संचालनालयाच्या पथकाने दाबोळी विमानतळावर एक कोटीचे तस्करीचे सोने जप्त केले. या प्रकरणी दोघा हवाई प्रवाशाला महसूल संचालनालयाच्या अधिकाऱयांनी अटक आहे. 3 किलो 229 ग्रॅम सोने या प्रवाशाने अवैद्य मार्गाने शारजाहून भारतात आणले होते. अटकेत असलेला एक प्रवाशी गोव्यातील असून त्या दोघांची नावे उघड करण्यात आली नाहीत.
 शनिवारी सकाळी महसूल संचालनालयाच्या गोवा विभागीय शाखेनेच ही कारवाई केली. संचालनालयाच्या अधिकाऱयांच्या पथकाला गोव्यातील एका हवाई प्रवाशाबद्दल संशय आला असता, त्यांनी त्याच्या बॅगांची झडती घेतली. मात्र, या झडतीत त्याच्या बॅगांमध्ये संशयास्पद असे काहीच आढळून आले नाही. त्यामुळे अधिकाऱयांनी त्याची वैयक्तिक झडती घेतली असता शरीराच्या बाहय़ भागात त्याने सोने लपवलेले असल्याचे आढळून आले. हे सोने 3 किलो 229 ग्रॅम वजनाचे असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 1 कोटी रुपये एवढी आहे.या प्रवाशाने हे सोने अवैद्य मार्गाने शारजाहून भारतात आणले होते. संशयामुळे तो महसूल संचालनालयाच्या तावडीत सापडला.
या  प्रवाशाकडे हे सोने चार कांडय़ांच्या स्वरूपात होते. तसेच त्याने आपल्या कमरेभोवतीही जाडजुड सोने बांधले होते. सोन्याच्या तस्करीच्या प्रयत्नात पकडला गेलेला हा प्रवासी एअर अरेबियाच्या विमानातून गोव्यात उतरला होता. महसूल संचालनालयाच्या अधियकाऱयांनी तस्करीच्या सोन्यासह त्याला ताब्यात घेतले व त्याची अधिक चौकशी केली असता आपल्याकडे हे सोने कोझीकोड केरळ येथील आपल्या सोबतच आलेल्या एका प्रवाशाने दिल्याची माहिती त्याने दिली. त्यामुळे अधिकाऱयांनी त्वरित हालचाल करून त्याच्या सोबतच आलेल्या त्या प्रवाशालाही ताब्यात घेतले त्यावेळी सोन्याच्या तस्करीसाठी आपण त्या प्रवाशाची मदत घेतल्याची कबुली त्याने दिली. त्यामुळे या दोन्ही प्रवाशांना महसूल संचालनालयाच्या अधिकाऱयांनी तस्करीच्या गुन्हय़ांखाली अटक केली आहे. या प्रकरणी संचालनालयाकडून अधिक तपास करण्यात येत आहे.