दहावीच्या परीक्षा 21 मे पासून

0
380
गोवा खबर:कोरोना लॉक डाऊनमुळे रखडलेली दहावीची परीक्षा 21 मे पासून सुरु होणार आहे.शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज त्याची घोषणा केली. बारावीचे राहिलेले दोन पेपर 20 आणि 22 मार्च रोजी होणार आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद असून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुद्धा होऊ शकल्या नव्हत्या. परीक्षा केव्हा होणार हे अनिश्चित असल्याने विद्यार्थी आणि पालक वर्गात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्याशिवाय सरकार वरील दबाव देखील वाढला होता.3 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील लॉक डाऊन सुरु झाल्या नंतर प्रलंबित असलेल्या परीक्षाबाबत काय करायचे यावर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती.मात्र गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्व न आल्याने 17 मे रोजी तिसऱ्या टप्प्यामधील लॉक डाऊन संपल्या नंतर त्यावेळच्या मार्गदर्शक तत्वानुसार निर्णय घ्यावा,असे ठरले होते.त्यामुळे पुन्हा एकदा परीक्षाबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
आता मात्र गृहमंत्रालयाची मार्गदर्शक तत्व आल्यामुळे दहावीच्या परीक्षा 21 मे पासून तर बारावीचे राहिलेले पेपर 20 आणि 22 मे रोजी घेतले जातील,असे सरकारने स्पष्ट केले आहे.