
गोवा खबर:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अथेन्स येथे शिक्षण आणि राजकारण क्षेत्रातील समुदायाला संबोधित केले. हेलेनिक फाऊंडेशन फॉर युरोपियन अँड फॉरेन पॉलिसीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
जहाल मतवाद आणि दहशतवाद ही सध्याची जागतिक आव्हाने असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. युरोप आणि भारतासाठी ही चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले. भारत आणि युरोपने दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी ग्रीसला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले. भारताच्या महत्वाकांक्षी सागरमाला प्रकल्पात ग्रीकच्या जहाज उद्योगासाठी अमाप संधी असल्याचे ते म्हणाले.