गोवा खबर:2017 ला निरोप देत 2018 चे गोव्यात जल्लोषात स्वागत करण्यात आले.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले होते.हॉटेल्स, रेस्टॉरेन्ट, शॅक्स,कॅसिनोंमध्ये संगीत रजनी बरोबर मनोरंजनाचे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
मांडवी नदीमधील कॅसिनो प्राईडमध्ये प्रख्यात पॉप सिंगर दलेर मेहंदीने लावलेल्या पंजाबी तडक्याने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली होती.दलेरने आपल्या गाजलेल्या गाण्यासोबत इतर पंजाबी गाणी सादर करून उपस्थितांना ठेका धरायला भाग पाडले.दलेर सोबत अभिनेत्री करिश्मा तन्ना,पायल रोहतांगी, अंगूरी भाभी फेम शुभांगी आणि कॉमेडियन बलराज सायाल यांनी एक से बढकर एक परफॉर्मन्स सादर करून कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.12 वाजता फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.कॅसिनो प्राईडच्या कॅलेंडरचे प्रकाशन देखील यावेळी उपस्थित सेलिब्रिटींच्या हस्ते करण्यात आले.यावेळी श्रीनिवास नाईक, रवी केसर,अमरजीत चावला आदी उपस्थित होते.