
म्हापसा पोटनिवडणुकीसाठी जोशुआने हजारो समर्थकांच्या उपस्थित आपला उमेदवारी अर्ज सादर केला.यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत,भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर,भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे उपस्थित होते.
माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांचे सुपुत्र असलेल्या जोशुआ यांना देखील मतदारांची पसंती मिळत आहे.वडीलांचा वारसा चालवण्यासाठी जोशुआ सज्ज झाला आहे.म्हापसा नगरपालिकेत नगरसेवक असलेल्या जोशुआने वडीलांच्या पश्चात त्यांचा वारसा चालवण्यासाठी आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
मांद्रे मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दयानंद सोपटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
जोशुआ आणि सोपटे यांचा प्रचार जोरदार सुरु असून दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिकक्यानी विजयी होतील असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.भाजप सरकारने राज्यात आणि केंद्रात केलेल्या विकास कामांची पोचपावती मतदार यावेळी देतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
