दक्षिण गोव्यात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज

0
971
गोवा खबर: लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणी साठी पाहिल्यांदाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी 5 व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे.त्यामुळे दक्षिण गोव्यतील सर्व विसही मतदारसंघातील मतमोजणीला सुमारे चौदा तासांपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे, अशी महिती दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी दिली आहे.
  उद्या गुरुवारी  सकाळी सात वाजता स्ट्रॉंग रूम उघडला जाणार आहे.त्याची माहिती सर्व उमेदवारांना देण्यात आलेली आहे.सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी एकूण दहा सभागृहात  होणार आहे.सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या पहिल्या  फेरीला सुरुवात केली जाणार आहे.एका मतदारसंघातील ईव्हीएम मतमोजणी केल्यानंतर ड्रॉ काढून पाच व्हीव्हीपॅटची मोजणी केली जाणार आहे.प्रत्येक मतदारसंघातील ईव्हीएममधील मत मोजणी नंतर त्या मतदारसंघातील कोणत्याही 5 व्हीव्हीपॅट मशीन्स मधील मतांची मोजणी केली जाणार आहे.
यावेळी ईव्हीएमच्या मोजणी नंतर व्हीव्हीपॅटची मोजणी होणार असल्याने दरवेळीपेक्षा यावेळी मतमोजणीला चौदा पेक्षा जास्त तास लागू शकतात ,अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.