थिवीत बस जळून खाक ;12 लाखाचे नुकसान

0
774

गोवा खबर:थिवी  येथे पार्क करून ठेवलेल्या बसला काल दुपारी  अचानक आग लागली. या आगी बस संपूर्ण जळून खाक झाली असून सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाले.म्हापसा अग्निशामक दलाच्या जवांनानी घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 6 लाख रुपयांची मालमत्ता वाचविली.

सांखळी येथील रामप्रसाद नाईक यांच्या मालकीची जीए 04 टी 6794 ही खासगी बस कंपनीच्या कामगारांना नेत व परत आणते. काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बसचालक बॅनेडिटो डिसोझा हे बस थिवी येथे पार्क करून  थांबले होते. यावेळी बसच्या इंजीनमधून धूर बाहेर येऊ लागल्याने चालकाने त्वरित इंजिनकडे धाव घेऊन बॅटरीच्या वायर्स काढल्या. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.

घटनेची माहिती मिळताच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फर्राव यांच्या मार्गदर्शनाखाली जवान लिडींग फायरमेन नारायण चोडणकर, चालक ऑपरेटर गोविंद देसाई, संतोष तानावडे, परेश मांद्रेकर यांनी आग विझविण्यास मदत केली. या आगीत बसची सहा लाखांची मालमत्ता वाचविण्यास यश आले.