थिवीत धावत्या बसला आग,प्रवासी सुखरूप

0
898

गोवा खबर: थिवी-माडेल येथे आज सायंकाळी एका प्रवासी बसला शार्टसर्किटमुळे आग लागली.सर्व प्रवासी वेळीच सुखरूप बाहेर पडल्याने  अनर्थ टळला.ही बस म्हापसा येथून थिवी येथे जात असताना वाटेत ही घटना घडली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगिवर नियंत्रण मिळवले मात्र तो पर्यंत बस जळून खाक झाली होती.बस मध्ये 10 ते 15 प्रवासी होते.बसला आग लागली असल्याचे समजताच सगळे प्रवासी बाहेर पडल्याने अनर्थ टळला. बसला आग लागल्याचे कळताच बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला नेण्याचा प्रयत्न केला त्यात बसची धडक रस्त्या शेजारी असलेल्या एका बाइकला बसली.या धडकेमुळे ती बाइक देखील जळून खाक झाली.बसचा फक्त सांगाडा उरला आहे.