त्सुनामीवरील उपाय योजनांवर बैठक संपन्न

0
110

                             

गोवा खबर: बंदर कप्तान खात्याच्या कार्यालयात त्सुनामीवरील उपाय योजनांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. बंदर कप्तान आणि नोडल अधिकारी श्री जेमस् ब्रागांझा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

 बैठकीच्यावेळी त्सुनामी यासारख्या आपत्तीच्या काळात घेण्यात येणा-या आवश्यक उपायांसंबंधी  सविस्तर चर्चा करण्यात आली. आपत्ती आल्यास कसे सामोरे जाता येईल आणि आपत्तीच्यावेळी संबंधितांची काय भुमिका असेल यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली. योग्य समन्वय आणि संबंधितांचे योग्य सहकार्याने त्सुनामीवर कशी मात करता येईल यावरही बैठकित भार देण्यात आला.

अतिरिक्त जिल्हाधिकारी-२  गोपाल पार्सेकर, उपजिल्हाधिकारी आणि विशेष विभागिय अधिकारी-२,  मामू हागे आयएएस, साहाय्यक विभागिय अधिकारी श्री अजित कामत, बीएसएनएलचे अभियंता  के. ए. गवळी, रेडियो अधिकारी  सी डिसा, आरोग्य सेवा संचालनालयाचे डॉ. उत्कर्ष बेतोडकर आणि विविध सरकारी खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.