त्रिसूर इथल्या सेंट थॉमस महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवाचे राष्ट्रपतींनी केले उदघाटन

0
976

गोवा खबर:केरळमधल्या  त्रिसूर इथल्या सेंट थॉमस महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज  उदघाटन केले.

 

केरळमधील ख्रिस्ती समुदाय केवळ भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगातला  प्राचीन समुदाय आहे , असे कोविंद यांनी यावेळी सांगितले. त्यांचा वारसा आणि इतिहास संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. तसेच बहुविधता आणि वैविध्यतेत एकता याप्रती भारताच्या प्रतिबद्धतेचे ते प्रतीक आहे; असे ते म्हणाले.

सत्य तुम्हाला मुक्त करेल हे सेंट थॉमस महाविद्यालयाचे ब्रीद अत्यंत सुयोग्य आहे. शिक्षणाचे खरे मूल्य परीक्षा आणि पदव्यांमध्ये नाही. तर इतरांना आपण कशी मदत करतो, आपल्यापेक्षा कमी संपदा असलेल्यांची कशी काळजी घेतो आणि आपल्याला जे मिळाले आहे ते त्यांच्याबरोबर कसे वाटून घेतो यात खरे शिक्षणाचे मूल्य दडलेले आहे: याची आठवण हे ब्रीदवाक्य करून देते असे राष्ट्रपतींनी सांगितले. समाजाला ज्ञानदान करण्याचे आणि केरळ व  देशाची स्वप्न पूर्ण करण्याचे हे अभियान अखंड सुरू राहूदे . सेट थॉमस महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्था या प्रवासात अत्यंत महत्वाच्या आहेत, असे राष्ट्रपतींनी सांगितले.