तौक्ते वादळाच्या संकटकाळात कॉंग्रेस पक्षाची तातडीने मदत कार्य पोचविण्याची तयारी : दिगंबर कामत 

0
215
गोवा खबर : तौक्ते वादळाचा तडाखा गोव्याला बसल्याने अनेक भागांत खुप नुकसान झाले आहे. घरे, झाडे, वाहनांची मोठ्या प्रमाणात  हानी झाली. कॉंग्रेस पक्षाने एका मदत कक्षाची स्थापना केली असुन, आमचे कार्यकर्ते कमितकमी वेळेत लोकांना मदत देण्याचा प्रयत्न करतील असे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी म्हटले आहे.
वादळाचा धोका आहे हे हवामान खात्याने सांगुन सुद्धा गोव्यातील भाजप सरकार नेहमीप्रमाणे सुस्त राहिले. दक्षिण व उत्तर गोव्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या पथकाकडे मी आज सकाळपासुन संपर्कात असुन, गोव्यातील अनेक कामांवर माझी देखरेख आहे.
संपुर्ण गोव्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरे, झाडे, वाहने  यांचे नुकसान झाले आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. सरकारने ताबडतोब दुरूस्ती काम हातात घेणे गरजेचे आहे.
मडगाव शहरात शिरवडे येथे महाकाय पिंपळाचे झाड कोसळले. कोंब मडगाव येथे एका घरावर झाड पडुन नुकसान झाले. मोती डोंगरावरील टि. बि. हॉस्पिटल समोर झाडे पडुन रस्ता अडवला गेला. वादळी वारे व पावसाची तमा न बाळगता आज मदत कार्य करण्यासाठी पुढे आलेल्यांचे मी अभिनंदन करतो असे दिगंबर कामत म्हणाले.
कॉंग्रेस पक्षाने डॉ. प्रमोद साळगावकर, ज्यो डायस, विजय भिके, शंकर किर्लपालकर, जनार्दन भांडारी, जेम्स आंद्राद, अहराज मुल्ला यांचा एक मदत कक्ष तयार केला असुन, विवीध भागांतील गट समिती व कार्यकर्त्यांकडे संपर्क साधुन ते मदत कार्य करणार आहेत असे दिगंबर कामत यांनी सांगीतले.
लोकांनी घरातच सुरक्षित रहावे व कारण नसताना घराबाहेर पडु नये असे आवाहन दिगंबर कामत यांनी केले आहे. कोविड संकटकाळात सर्वांनी आपल्या आरोग्याची प्रथम काळजी घ्यावी असे ते म्हणाले.