ते बेपत्ता 8 ट्रेकर्स सुखरूप,कर्नाटक मधील जंगलात सापडले

0
974

 

गोवा:चोर्ला घाटात काल ट्रेकिंगसाठी गेल्या नंतर बेपत्ता झालेले 8 जण आज कर्नाटक मधील दाट जंगलात सापडले.कर्नाटक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचा शोध लावण्यात महत्वाची भूमिका बजावली. पणजी रायबंदर आणि पर्वरी येथील 8 जण ज्यात 7 अल्पवयिन मुलींचा समावेश असलेला गट ट्रेकिंगसाठी गोवा कर्नाटक सिमेवरील चोर्ला घाटात गेले होते. सगळी मुले बेपत्ता झाल्याचे समजल्यानंतर त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात होता.मूसळधार पाऊस आणि दाट धुके यामुळे शोधकार्यात अड़थळे येत होते.अखेर आज सकाळी कर्नाटक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या 8 ट्रेकर्सचा शोध लावण्यात यश मिळवले.