तेल गळती गोळा करण्याच्या जहाजाचा सुभारंभ

0
979

गोवा खबर:बंदर खात्याचेमंत्री मायकल लोबो यांनी पणजीतील बंदर कप्तान धक्क्यावर  नदीच्या पाण्यात गळती होणारे तेल गोळा करण्याच्या नवीन जहाजाचा सुभारंभ केला. य़ावेळी महापौर  उदय मडकईकर, बंदर खात्याचे सचिव  पी. एस पेड्डी आयएएस, कॅप्टन ऑफ पोर्ट्सचे जेमस् ब्रागांझा, माजी महापौर   विठ्ठल चोपडेकर आणि स्थानिक कोर्पोरेटर  सोरया पिंटो मखीजा उपस्थित होत्या.

४.१८ कोटी रूपये खर्चाचे हे जहाज असून टाकीत ७ हजार लिटर पर्यंत तेल साठून ठेवता येते.

हे जहाज म्हणजे बंदर खात्याचा मैलाचा दगड असल्याचे सांगून लोबो यांनी या जहाजाला खूप मागणी होती आणि ते गोव्याच्या जलमार्गाची मालमत्ता म्हणून सिध्द होईल असे सांगितले. हे जहाज बिठ्ठोण येथे ठेवण्यात येणार असून आपत्तीच्यावेळी ते जहाज, तेथून हलणार आणि तेल किनाऱ्य़ाकडे नेऊन संशोधनासाठी पाठविणार आणि तेल गळतीच्या अगोदर तेलाचा संग्रह करणे, पर्यावरणाभिमुख प्रक्रिया आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

खाण व्यवसाय बंद झाल्याने राज्याचा महसूलाचा मुख्य घटक गमवावा लागला आणि हा प्रश्न लवकरच सुटणार असून बार्ज मालकांना तसेच ज्या लोकांना नोकरी गमवावी लागली त्याना मोठी चालना मिळेल बार्ज कर  काडून टाकण्याचा सरकारचा विचार असल्याचे  लोबो यांनी सांगितले.

 मडकईकर यांचेही यावेळी भाषण झाले.  जेमस् ब्रागांझा यांनी स्वागत केले आणि नंतर आभार मानले. य़ावेळी उपस्थितांसमोर तेल संग्रहाचे थेट प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.