तेरा मेरा बीचच्या दुसऱ्या पर्वाला जानेवारीच्या शेवटच्या दिवसांत प्रारंभ

0
1149

 

 

~एक वेगळ्या अद्वतीय अशी मोहिम ज्यात कचरा व पैसा समान आहे. ही मोहिम कांदोळी-बागा या किनारपट्टीवर होणार असून समुद्रावरील लोक कचऱ्याच्या मोबदल्यात पेय व सनडाउनर्स मिळवू शकतात. प्लास्टिक स्ट्रॉ, सिगरेट बट्स व बॉटल कॅप्स यांचा वापर पैशांच्या स्वरुपात करता येईल~
 

गोवा खबर:दृष्टी मरिनतर्फे तेरा मेरा बीचच्या विलक्षण अशा दुसऱ्या जन जागृती अभियानाला 30 जानेवारी 2019 रोजी प्रारंभ होत आहे. ही मोहिम पर्यटक हंगामाच्या शेवटपर्यंत चालू राहणार आहे.

तेरा मेरा बीच मोहिमेच्या माध्यमातून दृष्टी मरिन लोकांना खास करून पर्यटकांना संगीत व कलेच्या माध्यमातून स्वच्छता व किनारपट्टीवरील समुद्र व्यवस्थापनातून किनाऱ्यावरील स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण करू पाहत आहेत. या मोहिमेत विचित्र वेस्ट बार, आर्ट इन्स्टॉलेशन व समुद्रावरील स्वच्छता या गोष्टी असणार आहेत.

या विलक्षण अशा वेस्ट बारमध्ये कचरा हा पैशासमान असणार आहे. ही मोहिम कांदोळी-बागा या किनारपट्टीवर होणार असून समुद्रावरील लोक कचऱ्याच्या मोबदल्यात पेय व सनडाउनर्स खरेदी करू शकतात. प्लास्टिक स्ट्रॉ, सिगरेट बट्ट्स व बॉटल कॅप्स यांचा वापर पैशांच्या स्वरुपात करता येईल. वेस्ट बार विविध ठिकाणी सायंकाळी 4 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुले असणार आहे.

बुधवार, 30 जानेवारीला सायंकाळी 4 वा. झांझिबार, बागा येथील टिटोस लेनच्या शेवटी पहिले वेस्ट बार उभारले जाणार आहे.

दृष्टी मरिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शंकर तेरा मेरा बीचबद्दल म्हणाले, “आम्ही मागील पर्यटक महोत्सवात 150 दिवसांची यशस्वी मोहिम राबवली होती ज्याचे मुख्य उद्दीष्ट समुद्रावरील साफसफाई व कचरा व्यवस्थापन याबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम आम्ही यशस्वीरित्या पार पाडले. आम्ही सकारात्मक प्रभाव पाडल्यामुळे या मोहिमेला यावर्षीदेखील पुन्हा ही मोहिम राबवण्याचे ठरविले. महिन्याच्या सुरुवातीला ही मोहिम समुद्र किनाऱ्यावरील साफसफाईला प्राधान्य देऊन आकर्षक रितीने जनजागृती करणार आहे.”

उपक्रमाचे व्यवस्थापक नोरिन वॅन होलस्टीन ज्यांची ही संकल्पना होती व ज्यांनी दृष्टी मरिन सोबत या मोहिमेसाठी भागादारी केली ते म्हणतात, “या मोहिमेला मागील वर्षी पर्यटक व समुद्रावर येणाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला व त्यांच्यात देखील किनाऱ्यावर स्वच्छता राखण्याच्या जबाबदारीबद्दल जागृती निर्माण झाली. यावर्षी आम्ही विलक्षण वेस्ट बारची संकल्पना आखली असून इथे कचऱ्याचा उपयोग पैशांच्या बदल्यात करू शकतो. यातून आम्ही सांगू इच्छितात कि जर कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले तर त्याला देखील मूल्य आहे हे लोकांना पटवून द्यायचे आहे. याव्यतिरिक्त आम्ही शॅक्सकडून होणाऱ्या स्ट्रॉंचा वापर कमी करू इच्छितो आहोत.”

तेरा मेरा बीचच्या माध्यमातून पर्यटक तसेच समुद्रावर येणाऱ्या लोकांनी कचरापेटीचा किनाऱ्यावर वापर करणे, तयेच कचऱ्याचे व्यवस्थापन व किनाऱ्यांवरील स्वच्छता मोहिमेत भाग घेणे हे यामागचे उद्दीष्ट आहे. ही मोहिम गोवा सरकार, गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ यांच्या सहकार्यने गोव्याचा किनारा स्वच्छ ठेवण्याच्या हेतूने राबवण्यात आली आहे.

किनाऱ्यावरील साफसफाईसाठी गोवा सरकारने दृष्टी मरिनशी डिसेंबर 2016 साली तात्पुरता कचरा उचलण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी नियुक्ती केली होती. दृष्टी मरिनने किनाऱ्यावरिल स्वच्छतेसाठी मनुष्बळ प्रदान केले आहे व इतर सुविधा देखील पुरवल्या आहेत व हाच कचरा साळगाव कचरा व्यवस्थापन प्रकल्पात जातो. दृष्टीकडे पायभूत सुविधा व व्यवस्थापन क्षमता आहेत ज्यमुळे ते गोव्याच्या किनाऱ्यावर विविध उपक्रम राबवू शकतात.