तीन वेळा तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत

0
866
तीन वेळा तलाकविषयी सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. आज न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करुन पंतप्रधान मोदी म्हणाले, यामुळे मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क मिळणार आहे.  तसेच महिला सक्षम होण्यासाठी निकाल परिणाम होणार आहे.
“सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने तीन वेळा तलाकविषयी ऐतिहासिक निकाल दिला आहे. महिला सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यासाठी आणि मुस्लिम महिलांना समानता मिळण्यासाठी हा निकाल महत्वाचा ठरणार आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हटले आहे.